Maharashtra Mahayuti Government New Cabinet : विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त कामगिरी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. महायुतीने 288 विधानसभा मतदारसंघात 230 ठिकाणी विजयाचा झेंडा फडकवलाय. यात भाजप 132, शिवसेना (एकनाथ शिंदे) 57 आणि राष्ट्रवादीला 41 (अजित पवार) जागांवर यश मिळालंय. ही आकडेवारी पाहात भाजप महायुतीत मोठा भाऊ ठरला आहे. आता महायुतीकडून सत्तास्थापनेची तयारी सुरु असून मंत्रिमंडळाचा फॉर्म्युल्या आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावं यावर निर्णय झालाच समोर आलंय. 


असा आहे महायुतीचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार 6-7 आमदारांमागे एक मंत्रिपद देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार भाजपला सर्वाधिक 22-24, शिवसेनेला 10-12 आणि राष्ट्रवादीला 8-10 मंत्रिपदांची शक्यता सांगण्यात येतं आहे. त्यासोबत महायुतीच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागली यावरही निर्णय झालाच समजतं. बघूयात महायुतीतील मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी


मंत्रिमंडळात 'या' 27 चेहऱ्यांना मिळणार संधी? 


भाजपमधून यांची मंत्रिमंडळात वर्णी 


देवेंद्र फडणवीस
गिरीष महाजन
सुधीर मुनगंटीवार
चंद्रशेखर बावनकुळे
मंगलप्रभात लोढा
सुरेश खाडे 
प्रवीण दरेकर
पंकजा मुंडे
राहुल कुल 
नितेश राणे 
चित्रा वाघ 
प्रसाद लाड 
किसन कथोरे


शिंदेंचे संभाव्य मंत्री


एकनाथ शिंदे
भरत गोगावले


संजय शिरसाट 
प्रताप सरनाईक 
संजय राठोड 
 गुलाबराव पाटील
 दादा भुसे


 


हेसुद्धा वाचा - 'महायुती 2.0' सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं? तिघांचा फॉर्म्युला ठरला?


 


राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री


अजित पवार
धननंज  मुंडे
दिलीप वळसे पाटील
आदिती तटकरे
छगन भुजबळ
धर्मरावबाबा अत्राम 
अनिल पाटील


दरम्यान सोमवारी 25 नोव्हेंबरला होणाऱ्या शपथविधीमध्ये कोण कोण मंत्री शपथ घेणार हे पाहणे औत्सुकाच राहणार आहे.