Mumbai Polling Stations Voters: महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 36 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी 10 विधानसभा मतदारसंघ हे मुंबई शहर जिल्ह्यात आणि 26 विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात आहेत. सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून एकंदर निवडणूक कामाचा आढावा घेतल्यानंतर मतदान केंद्रांचे विकेंद्रीकरण आणि सुसूत्रीकरण करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. एका मतदान केंद्राच्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त केंद्रे असल्यास ते जवळच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. सुसूत्रीकरणानंतर मतदान केंद्रांमध्ये झालेल्या बदलाबाबत मतदारांना प्रसारमाध्यम, समाजमाध्यमाद्वारे माहिती देण्यात आली आहे. यासोबत मतदान केंद्रांची माहिती असलेल्या ‘क्यूआर कोड’सह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले पत्र प्रत्येक मतदारांच्या घरी जावून देण्यात येत आहेत.  

 

मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पिण्याचे पाणी,  स्वच्छतागृह, रांगांमध्ये आसन व्यवस्था, तसेच गर्दी झाल्यास मतदारांकरीता प्रतिक्षा कक्ष इत्यादी किमान निश्चित सुविधा पुरविण्यात येणार आहेत. उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने नामनिर्देशन पत्र व शपथपत्र भरण्याकरीता व निवडणुकीच्या अनुषंगाने विविध परवानगीसाठी अर्ज करण्याकरिता ‘सुविधा’ या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मतदार नोंदणी


मतदार नोंदणीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवसांपुर्वी मतदार नोंदणी करता येईल. म्हणजे दि. 19 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जातील.संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात मतदार नोंदणीबाबतचे अर्ज उपलब्ध आहेत. त्या कार्यालयात अर्ज भरून जमा करावयाचे आहे.तसेच ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Voter helpline App  वर जाऊन मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासता येईल व नवीन मतदार नोंदणी या ॲपद्वारे करता येईल. KYC App - उमेदवारांबाबत माहिती या ॲपवर उपलब्ध होऊ शकेल Cvigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे 100 मिनिटांत निराकरण केले जाते.

 

मतदार हेल्पलाईन क्रमांक.  1950

 

जिल्हाधिकारी मुंबई उपनगर कार्यालय- Toll Free No. 18002682910

 

जिल्हाधिकारी मुंबई शहर यांचे कार्यालय- नियंत्रण कक्ष क्रमांक-  022-2082 2781

 

निवडणूक नियंत्रण कक्ष - 7977363304

मुंबई उपनगर जिल्ह्याबाबत माहिती


एकूण मतदान केंद्र 7574 

सहकारी गृहनिर्माण सोसायटी मधील मतदान केंद्र 553

झोपडपटटी परिसरात मतदान केंद्र 229

मुंबई शहर जिल्हयात मंडपातील मतदान केंद्र 1302

पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्र 139

 

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या


 

क्रमांक मतदार संघ मतदारांची संख्या

१५२ बोरीवली ३२३६९५

१५३ दहिसर २७६२९८

१५४ मागाठाणे ३०२१३०

१६० कांदिवली २८५०८३

१६१ चारकोप ३१४२२२

१६२ मालाड पश्चिम ३५२७६१

१५८ जोगेश्वरी २९५८२१

१५९ दिंडोशी ३०२६०८

१६३ गोरेगाव ३२४३७६

१६४ वर्सोवा २८२८१९

१६५ अंधेरी पश्चिम २८५२२१

१६६ अंधेरी पूर्व २८४७०८

१५५ मुलुंड २९४४२३

१५६ विक्रोळी २४१११४

१५७ भांडूप पश्चिम २८४२३१

१६९ घाटकोपर पश्चिम २७३३४४

१७० घाटकोपर पूर्व २४७३९०

१७१ मानखुर्द शिवाजीनगर ३२३४२०

१७२ अणुशक्तीनगर २६६५४८

१७३ चेंबूर २५७१६५

१६७ विलेपार्ले २७४२५८

१६८ चांदिवली ४४६७६७

१७४ कुर्ला २८९४६८

१७५ कलिना २३९८६३

१७६ वांद्रे पूर्व २४७६३९

१७७ वांद्रे पश्चिम २८७०२५

 

1200 पेक्षा अधिक मतदार संख्या असलेले 1276 मतदान केंद्र आहेत. तर 10 हजार पेक्षाअधिक मतदार संख्या असलेले 139 मतदान केंद्र स्थळ आहेत.

 

महिला 35 लाख 61 हजार 587

पुरुष 40 लाख 85 हजार 550

तृतीयपंथी 831

ज्येष्ठ नागरिक 93 हजार 448

*नवमतदार संख्या 1 लाख 22 हजार 919

दिव्यांग मतदार 17 हजार 209

सर्व्हिस वोटर 1089

अनिवासी भारतीय मतदार 1867

एकूण मतदारांची संख्या 76 लाख 47 हजार 967

मुंबई शहर जिल्ह्याचा तपशील


एकूण मतदान केंद्र 2537  

उत्तुंग इमारतीमधील (Highrise Building) मतदान केंद्र 156

सहकारी गृहनिर्माण सोसायटी मधील मतदान केंद्र 100

झोपडपटटी परिसरात मतदान केंद्र 313

मुंबई शहर जिल्हयात मंडपातील मतदान केंद्र 75

पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्र 17

विधानसभा मतदार संघनिहाय मतदार संख्या


धारावी 260747

सायन-कोळीवाडा 281299

वडाळा 204905

माहिम 225367

वरळी 263642

शिवडी 273955

भायखळा 257849

मलबार हिल 260538

मुंबादेवी 241235

कुलाबा 264739

मतदारांची एकूण संख्या 25 लाख 34 हजार 276

 

महिला 11 लाख 71 हजार 808

पुरुष 13 लाख 62 हजार 224

तृतीयपंथी 244 

ज्येष्ठ नागरिक (85+) 54 हजार 63

नवमतदार संख्या (18-19 वर्ष) 37 हजार 894

दिव्यांग मतदार 6 हजार 334

सर्व्हिस वोटर 392

अनिवासी भारतीय मतदार 406