Maharashtra Vidhansabha AI Survey :  महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर आलीय. त्या आधी झी मिडियानं महा AI सर्वे केलाय. या सर्वेतून आज निवडणुका झाल्यास कुणाचं सरकार येणार असा प्रश्न आम्ही राज्यातील जनतेला विचारला. जनतेनं कौल महायुतीच्या बाजून दिल्याचं सर्वेतून समोर आलंय, त्यात  महायुतीच्या सरकारला 47 टक्के जनतेनं पसंती  दिलीय. तर मविआच्या  बाजूनं 39 टक्के लोकांनी कौल दिलाय. तर इतर पक्षांना 14 टक्के लोकांनी पसंती दिलीय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण होणार मुख्यमंत्री?
महा AI सर्वेतून आम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती देणार असा प्रश्न विचारला त्या प्रश्नाला सर्वाधिक पसंती जनतेनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला दिलीय. मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला देण्यात आलीय तर दुसरी पसंती  एकनाथ शिंदेंच्या नावाला देण्यात आलीय. तर तिसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरेच्या नावाला जनतेनं कौल दिलाय 


कोणत्या पक्षाला स्वबळावर सत्ता?
राज्यातील कोणत्या पक्षाला स्वबळावर सत्ता मिळू शकते का असा सवाल राज्यातील जनतेला विचारला त्यावर भाजपला 38 टक्के लोकांनी पसंती दिलीय.  शिवसेना शिंदे गटाला 22 टक्के लोकांनी कौल दिलाय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं  17 टक्के मतं व्यक्त केलीय.  तर काँग्रेस पक्षाला केवळ 14 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 9 टक्के लोकांनी पसंती दिलीय 


उद्धव ठाकरेंना सहानभूती मिळणार?
शिवसेना पक्ष फुटीनंतर सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळेल का असा प्रश्न आम्ही सर्वेतून राज्यातील जनतेला विचारला. त्याला 35 टक्के लोकांनी सकारात्कम प्रतिसाद दिलाय. त्यात  35 टक्के जनतेला वाटतंय यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल तर 45 टक्के लोकांना ठाकरेंना सहानुभूती मिळणार नसल्याचं वाटतंय. तर 20 टक्के लोकांनी सांगता येत नाही अशी मतं मांडलीय


हे ही वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा AI सर्व्हे, 'हा' ठरणार निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा


राज्यात आज विधानसभा निवडणूक झाल्या तर?
आज राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्यास महायुती सरकार येणार अशी पसंती राज्यातल्या 47 टक्के जनतेने दिलीय. लोकसभा निकालात महायुतीला मोठा फटका बसला होता. मात्र आता झी 24 तासच्या या महा AI सर्व्हेमध्ये महायुतीला कौल दिसतोय. त्यामुळे सध्याच्या घडीला उत्तम समन्वय असणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल.. 


लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरणार?
 लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसलाय. त्यामुळे आता लोकांना खुश करण्यासाठी महायुतीनं लाडकी बहीण योजना आणली तसंच लाडकी भाऊ योजनाही सुरू केलीय. मात्र या योजनेचा महायुतीला आगामी विधानसभेत फायदा होणार का याबाबत आम्ही महा सर्वे केलाय.   लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार का असा सवाल आम्ही लोकांना विचारला. त्यात  55 टक्के लोकांना लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल असं वाटतंय तर 30 टक्के लोकं योजना गेम चेंजर ठरणार नसल्याचं म्हणतात.


भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या सरकारमध्ये स्थान?
भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना पक्षात घेऊन त्यांना  भाजपनं पावण केल्याचा आरोप विरोधकांनी  वारंवार केलाय. त्यामुळे आम्ही भ्रष्टाचारांचे आरोप असणाऱ्य़ा नेत्यांना सरकारमध्ये स्थान देणं योग्य आहे का असा प्रश्न विचारला. त्यावर
 20 टक्के लोकांनी भ्रष्टाचाऱ्यांचे आरोप असलेल्यांना सरकारमध्ये स्थान देनं योग्य असल्याची भूमिका मांडली तर 70 टक्के लोकांनी भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्यांना पक्षात घेऊ नये असं म्हटलंय. तर सांगता येत नाही असं 10 टक्के लोकांना वाटतंय


हे ही वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा AI सर्व्हे, 'हा' नेता मतदारांच्या मनातील फेव्हरेट मुख्यमंत्री


मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला जेरीस आणलंय. 29 ऑगस्टला जरांगे विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरणार का असा प्रश्न जनतेला विचारला त्यावर  मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरणार असल्याचं 45 टक्के लोकांना वाटतंय तर 45 टक्के लोकांना हा मुद्दा निवडणुकीत प्रभावी ठरणार नाही असं वाटतंय. तर सांगता येत नाही असं 10 टक्के लोकांचं मत  आहे. 


जात, धर्म, संविधान मुद्दे प्रभावी ठरणार?
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह सेट केल्यामुळे पराभव झाल्याचा आरोप सत्ताधारी वारंवार करतात. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणुकीत जात, धर्म आणि संविधान हे मुद्दे प्रभावी ठरणार का यावर जनतेला काय वाटतं हे जाणून घेतलं. त्यात  संविधान बचावचा मुद्दा विधानसभेत प्रभावी ठरणार असल्याचं 35 टक्के लोकांना वाटतंय.तर 55 टक्के लोकांना संविधान बचावचा मुद्दा प्रभावी ठरणार नसल्याचं वाटतंय. तर 10 टक्के लोकांनी सांगता येत नसल्याचं म्हटलंय 


झी 24 तासच्या पहिल्या AI सर्वेतून यंदा अनपेक्षित निकाल लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे दिवाळीतील फटाक्यांसोबतच राजकीय फटाकेही जोरदार फुटणार यात शंका नाही.