रत्नागिरी, सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झुकतं माप, मविआत 85 टक्के जागावाटप निश्चित
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते उमेदवार जाहीर होण्याकडे. महाविकास आघाडी आणि महायुती लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. निवडणुकीसाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटप आणि उमेदवार निश्चितीला वेग आलाय.. मविआमध्ये आतापर्यंत 222 जागांचं वाटप पूर्ण झांलंय.. उरलेल्या जागावाटपाबाबत मविआचे राज्यातील प्रमुख नेते घोषणा करण्याची शक्यता आहे. लवकरच काँग्रेसची (Congress) पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.. पहिल्या यादीत 35 उमेदवारांचा समावेश असेल अशी माहिती सूत्रांनी दिलीये.. दिल्लीत काँग्रेसच्या स्किनिंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला झुकतं माप
कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena UBT) झुकतं माप मिळणारेय. दोन्ही जिल्ह्यातील आठ पैकी सहा जागांवर उद्धव ठाकरेंचे शिलेदार लढणार असल्याची माहिती मिळतेय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळणार असल्याची माहिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चार जागा उद्धव ठाकरेंकडे तर एक जागा शरद पवार यांच्याकडे जाणारेय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन पैकी दोन जागा उद्धव ठाकरेंकडे तर एक जागा शरद पवार यांच्याकडे जाणारेय. दोन्ही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याची माहिती मिळतेय.
मविआत 85 टक्के जागावाटप निश्चित
महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांचं जागावाटप कसं होतं याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मविआचं हे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडीतील जवळपास 85 टक्के जागावाटप निश्चित झालय. काही जागांबाबत मविआत अद्याप तिढा असला येत्या दोन दिवासत जागावाटपाची घोषणा होऊ शकते.
जागावाटपात काँग्रेसला सर्वाधिक जागा?
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वाधिक 13 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शरद पवार गटानं आठ आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 9 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अशातच आता महविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार ? याची माहिती समोर आलीय. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस 100, शिवसेना 100 तर राष्ट्रवादी 88 जागा लढवणार आहे. मित्रपक्षांना या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहेत
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी 18 ऑक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. तर स्वत: शरद पवार त्यांच्या पक्षाचे उमेदवार जाहीर करणार आहेत. मविआत सर्वात कमी म्हणजेच 88 जगांवर शरद पवार गटानं निवडणूक लढवण्याची तयारी दाखवलीय. कमी जागा लढवून जास्तीत जास्त स्ट्राईक रेट ठेवण्याचा पवारांचा गेम प्लान यशस्वी होतो का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.