Maharashtra Monsoon Session 2023 Live : विरोधी पक्षनेत्याशिवाय पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा; काँग्रेस हायकमांडकडून अद्याप निर्णय नाही
Maharashtra Assembly Monsoon Session 2023 Live : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे.
Maharashtra Assembly Monsoon Session 2023 Live : आज पासून पावसाळी अधिवेशन दुसरा आठवडा सुरू होत आहे. विरोधीपक्ष नेत्या शिवाय दुसरा आठवडा आहे. काँग्रेस हायकमांडकडून अद्याप नावावर शिक्कामोर्तब नाही त्यातच महायुतीचे संख्याबळ दोनशेहून जास्त यामुळे सत्ताधाराी बाकावर ऐक्य तर विरोधक कमकुवत अशी स्थिती आहे. काँग्रेस पक्षाकडून विधीमंडळ पायरीवर आज ही आंदोलन करण्यात येणार आहे. विधानभवन कामकाज यात पुरवणी मागणीवर चर्चा आज सुरू होणार आहे. कृषी ग्रामविकास यासह काही विभागावर पुरवणी मागणी चर्चा सुरू होणार तर शेती समस्या सरकार अनास्था यावर विरोधकांच्या 293 अंतर्गत दीर्घकाळ चर्चा आज राहील.