कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच यामध्ये काही अनपेक्षित भेटीगाठी आणि किस्सेही घडताना दिसत आहेत. जिथं राजकीय हेवेदावे दूर लोटत ही नेतेमंडळी अनोख्या मैत्रीपूर्ण नात्यानं एकमेकांसमोर येत आहेत. याचीच प्रचिती देणारी नुकतीच घडलेली एक घटना म्हणजे विधानभवन परिसरामध्ये लिफ्टसाठी वाट पाहणाऱ्या फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची अनपेक्षित भेट. (Maharashtra Assembly Session)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भेटीची चर्चा शमत नाही, तोच आता आणखी एक भेट चर्चेचा विषय ठरली आणि राजकीय वर्तुळात एकच हशा पिकला. पावसाळी अधिवेशनादरम्यान आणखी एका दिवसाच्या कामकाजादरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यानं गदारोळ माजलेला असतानाच तिथं आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मात्र मिश्किल संवाद झाल्याचं पाहायला मिळालं. 


विधानभवन परिसरात नेमकं काय घडलं? 


विधीमंडळाच्या आवारात मंगळवारी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आमनेसामने आल्याचं पहायला मिळालं. हे दोन्ही नेते समोरासमोर आले त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना उद्देशून गमतीनं एक वक्तव्य केलं. 'मला वाटलं लिफ्टमध्ये चालला आहात...' असं आदित्य ठाकरे फडणवीसांना पाहताच म्हणाले आणि या एका लहानशा संवादानंतर तिथं खुद्द हे दोन्ही नेते आणि त्यांच्या आजुबाजूला असणारी मंडळीसुद्धा खळखळून हसल्याचं पाहायला मिळालं. 


हेसुद्धा वाचा : दरेकरांना पाहताच उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले 'आधी याला बाहेर काढा,' त्यांनीही दिलं उत्तर, 'जसं बोलता...'


 


विधानभवनाच्या लॉबी परिसरामध्ये झालेला हा संवाद सध्या बराच चर्चेत असून, राजकीय हेवेदावे सुरु असतानाच अधूनमधूनच होणारा हा संवाद राजकारणालाही वेगळीच कलाटणी देतोय असं म्हणणं गैर ठरणार नाही. 



अशीच आणखी एक भेटही ठरलेली चर्चेचा विषय... 


यापूर्वी काही दिवसांपूर्वीच पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही अनपेक्षित भेट झाली. जिथं लिफ्टसाठी उभं असणाऱ्या फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी प्रवीण दरेकर यांना लिफ्टमध्ये पाहिलं. लिफ्ट आली असता त्यात दरेकरांना पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी, 'आधी यांना बाहेर काढा' असं म्हटलं. त्यावर प्रवीण दरेकर यांनीही त्यांना उत्तर दिलं. हा किस्सा बराच चर्चेत राहिला होता.