Maharashra Politics : राज्यातली आताची मोठी बातमी. औरंगाबादचं (Aurangabad) नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नाव आता धाराशीव करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ही माहित दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Ami Shah) यांचे आभार मानले आहेत.  मुख्यमंत्री  @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...! असं फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक पुरातन आणि ऐतिहासिक शहर अशी संभाजीनगरची ओळख आहे. इतिहासाचं वरदान असलेलं हे शहर. शहरात सगळीकडेच इतिहासाच्या पाऊलखुणा दिसून येतात. बिवी का मकबरा, पानचक्की, शहरातले ऐतिहासिक दरवाजे, नहर-ए-अंबरी अशा एक ना अनेक वास्तू या शहरात आहेत.  याच ऐतिहासिक औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर असं झालं आहे.



काय आहे इतिहास?
औरंगाबाद महापालिका सभेत 1995 मध्ये औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा ठरा राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचा प्रस्ताव माडंला, या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली.  पण या निर्णयाला तत्कालीन नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी न्यायालयात आव्हान दिलं, यावर कोर्टात सुनावणी सुरु असातनाच राज्यात आघाडी सरकार सत्तेत आलं. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी संभाजीनगरची अधिसूचना मागे घेतली आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टातील याचिका निकाली निघाली. 


महाविकास आघाडी सरकार अडचणीत असताना 29 जून 2022 ला तत्कालीन मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळावे औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर मविआ सरकार कोसळलं आणि भाजप-शिंदे गटाचं सरकार सत्तेत आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी मविआ सरकारने केलेला नामांतराचा ठराव रद्द केला. पण दोन दिवसांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत संभाजीनगर आणि धावाशिव नामांतराला मंजूर दिली.