मुंबई : शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. राज्यात ठिकठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर उस्मानाबादमध्ये बंदला हिंसक वळण लागलंय. संतप्त आंदोलकांनी एसटी बसेसच्या काचा फो़डल्या आहेत. तर कोकणात बंदला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं रत्नागिरी जिल्ह्यात बाजारपेठा बंद पाडल्या आहेत.


 कोल्हापुरात शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही आंदोलनात उडी घेतली.