Pod taxi will run from Bandra to Kurla via BKC  : महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे 15 हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी आज (5 मार्च 2024) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा करार झाला. यावेळी अन्य महत्वांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन (पॉड टॅक्सी) प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यास मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्यता दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच यावेळी वांद्रे ते कुर्ला स्थानका दरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून पॉड टॅक्सी धावणार असून त्याचे अंतर 8.80 कीमी एवढी आहे. त्यामध्ये 38 स्थानके असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवाशी एवढी त्याची क्षमता आहे. कमाल 40 किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहे, हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. याप्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दरम्यान, मुंबई महापालिकेप्रमाणेच  एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज या बैठकीत दिले. 



पॉड टॅक्सी म्हणजे काय?


पॉड टॅक्सी ही इलेक्ट्रिक वाहन असून ते चालकविरहित वाहतुकीचे साधन आहेत. या छोट्या ऑटोमेटेड कार आहेत ज्या मूठभर प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जास्त वेगाने नेण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.


काय आहे पॉड टॅक्सी वैशिष्टये?


पॉड टॅक्सी हे 4 ते 6 सीटर सेल्फ ड्रायव्हिंग वाहन आहे. साधारणपणे दोन प्रकारची वाहने असतात. एक दोरीच्या साहाय्याने तर दुसरा केबलच्या साहाय्याने हवेत चालते. वाहन चालकाऐवजी चार्ज करण्यायोग्य बॅटरीवर चालते.  वाहन शेअरिंग ऑटो म्हणून वापरले जाऊ शकते. यामध्ये एकाच वेळी पाचजण प्रवास करू शकतात. त्याची सरासरी गती प्रती तास 60 किमी आहे. इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी तुम्हाला टॅक्सीच्या टच स्क्रीनवर तुमचे स्थान टाइप करावे लागेल. ठराविक स्टेशनवर गाडी थांबते आणि दार आपोआप उघडते.  पॉड टॅक्सी रस्त्याच्या वर चालत असल्यामुळे प्रवासात प्रवाशाला रेड सिग्नल आणि वाहतुकीचा त्रास होत नाही.