मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईत (Mumbai) आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. तसंच मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro Inaugration) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. पंतप्रधान मोदी यांची बीकेसीत जाहीर सभा होतेय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मविआ सरकारला टोले लगावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबई नगरीच्यावतीने स्वागत करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आप्लयाला माहित आहे. ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि जो लोकापयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता, त्यातून मुंबईकरांची जनतेची सुटका करण्याची संधी आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाली, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.


मुंबईकरांचं जगणं सुसह्य करण्याची सुरुवात आज झाली आहे. येत्या दोन अडीच वर्षात मुंबईचा कायापालट आपल्याला पाहिला मिळेल. आजच्या दिवसात सुरुवात सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशी आहे. 2015 मध्ये  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पीएम मोदींच्या हस्ते या मेट्रो योजनेचं भूमिपूजन झालं होतं आणि आज त्यांच्याच हस्ते या योजनेचं लोकार्ण होतंय हो मोठा दैवी योग असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.


काही लोकांची इच्छा होती, पीएम मोदींच्या हस्ते हा कार्यक्रम होऊ नये, पण आज मोदींच्या हस्ते हा कार्यक्रम होतोय. पंतप्रधान मोदी यांच्या सारख्या धाडसी नेत्यामुळे विकास कामं पुन्हा सुरु झाली.  पंतप्रधान मोदी यांना पाहिले की सकारात्मक ऊर्जा मिळते, असं मुख्यमंत्री म्हणाले. 
मुंबईकरांचे विकास काम सुरु कायापालट होताना दिसेल. बाळासाहेब ठाकरे आणि मोदी यांचे स्नेहसंबंध होते,हिंदुत्त्व दोन्हीची भूमिका होती, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात मेट्रोचं काम जलद गतीने सुरू झाले. पण, मधल्या काळात काय झालं ते आपल्याला माहित आहेच...'आपला दवाखाना' आज 20 ठिकाणी सुरू होईल, मार्चपर्यत 100 'आपला दवाखाना' जनतेसाठी सुरू होतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. काहीची पोटदुखी -मळमळ वाढली...आता सहा महिन्यात आपण विकास काम करतोय. पुढील दोन वर्षात अजून काम किती करू याची चिंता त्यांना आहे. ते टीका करत राहील पण आपण विकास काम करत राहू असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.