CM on Jaideep Apte : गेल्या दोन आठवड्यापासून फरार असलेल्या जयदीप आपटेला (Jaideep Apte) अखेर अटक कऱण्यात आलीय. शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार असलेल्या जयदीपला कल्याणमधून अटक करण्यात आलीय.. दोन आठवड्यापासून तो फरार होता. कल्याण पोलिसांनी त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे दिलाय.. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला होता. शिवरायांची पुतळा जयदीप आपटेनं तयार केला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा  26 ऑगस्टला कोसळला. मात्र कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळला. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
शिल्पकार जयदीप आपटेच्या अटकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे पळून पळून कुठे जाणार,  महाराष्ट्र पोलिसांकडून कोणीच वाचू शकत नाही त्याला आता अटक करण्यात आली आहे. कठोर कारवाई होईल कुणालाही क्षमा नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. जे लोक अफवा पसरवत होते त्यांना या माध्यमातून एक चपराक मिळाली आहे. जे काही घडलं ते दुर्दैवी आहे पण त्यापेक्षा जास्त या विषयाचा राजकारण करणं हे दुर्दैवी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.  पुन्हा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा उभा राहील यावर आम्ही आता काम करत आहेत, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.


जयदीप आपटेच्या सुटकेची तयारी?
तर जयदीप आपटेला अटक करण्याच्या अगोदर 8 दिवसांपासून त्याच्या सुटकेची तयारी सुरू आहे. यासंदर्भात ठाण्यातून सूत्र हलतायेत, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. आपटेच्या जामिनीसाठी जे कायदेशीर मदत मिळतेय ती ठाण्यातून मिळतेय, असाही आरोप संजय राऊतांनी केलाय.


जयदीपला अटक की सरेंडर?
दरम्यान, जयदीप आपटेने गंभीर स्वरुपाचा गुन्हा केल्यामुळे पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचं सरकारी वकील तुषार भणगेंनी दिलीय. दुसरा आरोपी चेतन पाटील यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत. दोन्ही आरोपींना एकाच वेळी कोर्टात हजर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर जयदीप आपटेला काळोखातून आला आणि पकडलं, हे साफ खोटं असल्याची प्रतिक्रिया त्याच्या वकिलांनी दिलीय..जयदीप सरेंडर होणार होता हे ठरलं होतं. तसेच यावरून गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोपही विकल गणेश सोवणे यांनी केलाय..