CM Eknath Shinde : आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Maharashtra Farmers) आनंदाची बातमी... नाशिकहून लाँग मार्च (Farmers Long March) घेऊन मुंबईला निघालेल्या शेतकऱ्यांच्या जवळपास सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्यात आल्यात. उर्वरित मागण्यांसाठी मंत्री-आमदारांची समिती (Committee) स्थापन करण्यात आलीय. येत्या महिनाभरात ही समिती आपला अहवाल देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत (Assembly Session) केली. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4 हेक्टरपर्यंत वन जमीन कसणाऱ्या आदिवासींच्या नावे करणार, देवस्थान, गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करणार आणि गायरान जमिनीवरील घरे नियमित करणार, अशा घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. दरम्यान, सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या नसल्या तरी समाधानकारक मागण्या मान्य झाल्या आहेत. अजूनही काही शेतकरी नाराज असतील तर त्यांची गेल्यावर आम्ही समजूत काढू असं शेतकरी नेते आणि माजी आमदार जेपी गावित (JP Gavit) यांनी म्हंटलंय. 


कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी
आता कांदा उत्पादकांसाठी एक महत्वाची बातमी, कांद्याला 300 वरून 350 रूपये अनुदान देण्यात येणारंय...मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत याविषयीची घोषणा केलीय.  लाल कांद्याला 300 रुपय़े अनुदान आधीच जाहीर झालंय. मात्र कांदा उत्पादक आणि विरोधी पक्षाची वाढीव अनुदानाची मागणी होती.त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी हे अनुदान 300 वरून 350 रूपये करण्यात आल्याचं सांगितलंय. 


कापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी
दरम्यान, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. अमरवती इथं टेक्स्टाईल पार्क उभारण्यात आलं आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलण्यासाटी या पार्कची महत्त्वाची मदत होणार आहे, यासाठी पंतप्रधान मोदी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असं फडणवीस यांनी सांगितलं. या टेक्सटाईल पार्कमुळे दहा हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख लोकांन ा थेट आणि दोन लाख अप्रत्यकक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. हा सर्व कॉटन बेल्ट असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.