Maharashtra Corona Update | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, मृतांचा आकडाही वाढला
राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) मोठी वाढ झाली आहे.
मुंबई : राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) मोठी वाढ झाली आहे. मंगळवार 11 जानेवारीच्या तुलनेत आज (12 जानेवारी) 10 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचं निदान झालं आहे. तर मृतांचा आकडाही वाढला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 46 हजार 723 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 32 जण कोरोनामुळे दगावले आहेत. मंगळवारी कोरोना रुग्णांचा हा आकडा 34 हजार 424 इतका होता. तर 22 जणांचा मृत्यू झाला होता. (maharashtra corona update 12 january 2022 today 46 thousand 723 new cases have been reported in state)
मुंबईत आणि नागपुरातील रुग्ण किती?
मुंबईत गेल्या चोवीस तासात 16 हजार 420 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज मृतांची संख्याही वाढली आहे. आज 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या चोवीस तासात 14 हजार 649 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. सध्या राज्यात 1 लाख २ हजार 282 सक्रिय रुग्णसंख्या आहे.
तर उपराजधानी नागपुरातही दुप्पटीनं रुग्ण वाढलेत. नागपुरात आज 1 हजार 461 जणांना कोरोनाची लागण झाली. नागपुरात हीच आकडेवारी मंगळवारी 799 इतकी होती.
ओमायक्रॉनचे किती रुग्ण?
तसेच राज्यामध्ये 86 रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉनचे 86 पैकी 53 रुग्ण हे पुण्यातील आहेत. राज्यातील ओमायक्रॉनबाधितांचा आकडा हा एकूण 1 हजार 367 इतका झाला आहे.