Maharashtra Corona Update : सावधान | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, निर्बंध लागणार?
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची (Maharashtra Corona Update) वाटचाल ही 3 हजारच्या दिशेने सुरु झाली आहे.
मुंबई : राज्यासह मुंबईसाठी चिंताजनक बातमी आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची (Maharashtra Corona Update) वाटचाल ही 3 हजारच्या दिशेने सुरु झाली आहे. तसेच मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला आहे. राज्यात आज (9 जून) 112 रुग्णांची वाढ झाली आहे. तर मुंबईतील रुग्णसंख्येत किंचींत घट झाली आहे. तसेच सक्रीय रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या पार गेला आहे. तर राज्यात एका मृत्यूची नोंद झाली आहे. (maharashtra corona update 9 june 2022 today 2 thousand 813 covid patiets found in state active positive incresd)
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 813 कोरोना रुग्ण आढळले आहेत. बुधवारी हाच आकडा हा 2 हजार 701 इतका होता. चिंताजनक बाब म्हणजे सर्वाधिक रुग्णांचं निदान हे मुंबईत झालं आहे. मुंबईतील आकडा हा 1500 पार गेला आहे. मात्र यात काहीशी दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील रुग्णसंख्येत बुधवारच्या तुलनेत काहीशी घट झालीय.
मुंबईत आज 1 हजार 702 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी मुंबईतील रुग्णांचा आकडा 1 हजार 765 इतका होता.
सक्रीय रुग्णांमध्ये वाढ
राज्यातील सक्रीय रुग्णांमध्ये तडकाफडकी मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज 11 हजार 571 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. बुधवारी एकूण 9 हजार 806 सक्रीय रुग्ण होते.
निर्बंध लागू होणार?
कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होतेय. कोरोनाचा धोका वाढतोय. मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. राज्यात मास्कसक्तीही नाही. त्यामुळे वाढत्या दैनंदिन रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार काही निर्बंध लावू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील कोरोनाची दैनंदिन आकडेवारी
गुरुवार 9 जून : 2 हजार 813
बुधवार 8 जून : 2 हजार 701
मंगळवार 7 जून : 1 हजार 881
सोमवार 6 जून : 1 हजार 36
रविवार 5 जून : 1 हजार 494
शनिवार 4 जून : 1 हजार 357
शुक्रवार 3 जून : 1 हजार 134
गुरुवार 2 जून : 1 हजार 45
बुधवार 1 जून : 1 हजार 81