Maharashtra Din 2024 : 
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान
कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान... 

अशा ओळींनी ज्या महाराष्ट्र राज्याची ओळख करून दिली जाते त्याच महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावताना नकळतच अनेक पैलू समोर येतात आणि गतकाळातील प्रत्येक घडामोड आपल्या डोळ्यांचं  पारणं फेडते. या महाराष्ट्रासाठी येण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, प्राणांची आहूती दिली त्या प्रत्येकाप्रती आदरानं नकळत मान झुकते. अशा या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देणारा आणि हुतात्म्यांना वंदन करण्याचा, त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 1 मे आणि या दिवशी येणारा महाराष्ट्र दिन. 


हेसुद्धा वाचा : भारतीय कामगारांना रविवारची सुट्टी मिळवून देणाऱ्या मुंबईकराची गोष्ट! रविवारीच Week Off का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त महाराष्ट्र चळवळ आजवर सर्वांनीच अभ्यासाच्या माध्यमातून पाहिली, वाचली. त्यातून उमगलेली एक बाब म्हणजे सामान्यांपासून साहित्यिक आणि राजकारण्यांपर्यंत प्रत्येकानं या चळवळीमध्ये सहभागी होत नि:स्वार्थ भावनेनं राज्याच्या निर्माणासाठी योगदान दिलं होतं. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं याच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांच्या नावांवर एक नजर टाकत इतरांपर्यंतही पोहोचवा... 


संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांची नावं


सिताराम बनाजी पवार
जोसेफ डेव्हिड पेजारकर
चिमणलाल डी. शेठ
भास्कर नारायण कामतेकर
रामचंद्र सेवाराम
शंकर खोटे
धर्माजी गंगाराम नागवेकर
रामचंद्र लक्ष्मण जाधव
के. जे. झेवियर
पी. एस. जॉन
शरद जी. वाणी
वेदीसिंग
रामचंद्र भाटीया
गंगाराम गुणाजी
गजानन ऊर्फ बंडू गोखले
निवृत्ती विठोबा मोरे
आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
बालप्पा मुतण्णा कामाठी
धोंडू लक्ष्मण पारडूले
भाऊ सखाराम कदम
यशवंत बाबाजी भगत
गोविंद बाबूराव जोगल
पांडूरंग धोंडू धाडवे
गोपाळ चिमाजी कोरडे
पांडूरंग बाबाजी जाधव
बाबू हरी दाते
अनुप माहावीर
विनायक पांचाळ
सिताराम गणपत म्हादे
सुभाष भिवा बोरकर
गणपत रामा तानकर
सिताराम गयादीन
गोरखनाथ रावजी जगताप
महमद अली
तुळशीराम पुंजाजी बेलसरे
देवाजी सखाराम पाटील
शामलाल जेठानंद
सदाशिव महादेव भोसले
भिकाजी पांडूरंग रंगाटे
वासुदेव सुर्याजी मांजरेकर
भिकाजी बाबू बांबरकर
सखाराम श्रीपत ढमाले
नरेंद्र नारायण प्रधान
शंकर गोपाल कुष्टे
दत्ताराम कृष्णा सावंत
बबन बापू भरगुडे
विष्णू सखाराम बने
सिताराम धोंडू राडये
तुकाराम धोंडू शिंदे
विठ्ठल गंगाराम मोरे
रामा लखन विंदा
एडवीन आमब्रोझ साळवी
बाबा महादू सावंत
वसंत द्वारकानाथ कन्याळकर
विठ्ठल दौलत साळुंखे
रामनाथ पांडूरंग अमृते
परशुराम अंबाजी देसाई
घनश्याम बाबू कोलार
धोंडू रामकृष्ण सुतार
मुनीमजी बलदेव पांडे
मारुती विठोबा म्हस्के
भाऊ कोंडीबा भास्कर
धोंडो राघो पुजारी
ह्रुदयसिंग दारजेसिंग
पांडू माहादू अवरीरकर
शंकर विठोबा राणे
विजयकुमार सदाशिव भडेकर
कृष्णाजी गणू शिंदे
रामचंद्र विठ्ठल चौगुले
धोंडू भागू जाधव
रघुनाथ सखाराम बीनगुडे
काशीनाथ गोविंद चिंदरकर
करपैया किरमल देवेंद्र
चुलाराम मुंबराज
बालमोहन
अनंता
गंगाराम विष्णू गुरव
रत्नु गोंदिवरे
सय्यद कासम
भिकाजी दाजी
अनंत गोलतकर
किसन वीरकर
सुखलाल रामलाल बंसकर
पांडूरंग विष्णू वाळके
फुलवरी मगरु
गुलाब कृष्णा खवळे
बाबूराव देवदास पाटील
लक्ष्मण नरहरी थोरात
ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
गणपत रामा भुते
मुनशी वझीऱअली
दौलतराम मथुरादास
विठ्ठल नारायण चव्हाण
देवजी शिवन राठोड
रावजीभाई डोसाभाई पटेल
होरमसजी करसेटजी
गिरधर हेमचंद लोहार
सत्तू खंडू वाईकर
गणपत श्रीधर जोशी
माधव राजाराम तुरे(बेलदार)
मारुती बेन्नाळकर
मधूकर बापू बांदेकर
लक्ष्मण गोविंद गावडे
महादेव बारीगडी
कमलाबाई मोहित
सीताराम दुलाजी घाडीगावकर
 शंकरराव तोरस्कर 


(हुतात्म्यांची नावं माहिती सौजन्य विकीपीडिया)