Maharashtra Election 2022 : राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलंय. राज्यातील 17 जिल्ह्यात 92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतींसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार असून 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. 


छाननी आणि वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहिर केली होणार असून 4 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. उमेदवारांना प्रचारासाठी 14 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. 


कोणत्या 17 जिल्ह्यात निवडणूका?
ज्या 17 जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत त्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलडाणा यांचा समावेश आहे.