ठाकरे सरकारच्या खाते वाटपाची अंतिम यादी राज्यपालांकडे, स्वाक्षरी बाकी
ठाकरे सरकारच्या खातेवाटपाची अंतिम यादी राज्यपालांच्या मंजुरीसाठी राज भवनावर पाठविण्यात आली आहे.
मुंबई : ठाकरे सरकारच्या खातेवाटपाची अंतिम यादी राज्यपालांच्या मंजुरीसाठी राज भवनावर पाठविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्री तर शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन खाते देण्यात आले आहे. तर गृहमंत्रीपदी अनिल देशमुख, तर एकनाथ शिंदेकडे नगरविकास खाते सोपविण्यात आले आहे. राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्या त्या खात्याचा पदभार मंत्री घेणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप अखेर निश्चित झाले आहे. ही अंतिम यादी मंजुरीसाठी राज भवनावर पाठवण्यात आली आहे. राज्यपालांची स्वाक्षरी आज झाली नाही. विस्ताराची घोषणा उद्यावर गेली आहे. या यादीनुसार, मुख्यमंत्री ठाकरेंकडे सामान्य प्रशासन आणि विधी व न्याय खातं असणाराय. आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण आणि पर्यटन, एकनाथ शिंदेंकडं नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं सोपवण्यात आले आहे.
काँग्रेसच्या मंत्र्यांपैकी बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील यांच्याकडील अर्थमंत्रीपद अजित पवारांनी घेतले आहे. तर जयंत पाटीव यांना जलसंपदा खाते देण्यात आले आहे. अनिल देशमुख हे गृहमंत्री असणार आहेत.
शिवसेना यादी
एकनाथ शिंदे : नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (MSRDC)
सुभाष देसाई : उद्योग
आदित्य ठाकरे : पर्यावरण आणि पर्यटन
संजय राठोड : वने
दादा भुसे : कृषी
अनिल परब : परिवहन आणि संसदीय कार्य
शंकरराव गडाख : मृदू जलसंधारण
संदीपान भुमरे : रोजगार हमी
उदय सामंत : उच्च व तंत्र शिक्षण
मुख्यमंत्री- सामान्य प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा
राष्ट्रवादीची यादी
अजित पवार - वित्त व नियोजन (अर्थमंत्री)
जयंत पाटील - जलसंपदा
छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा
अनिल देशमुख - गृह
दिलीप वळसे पाटील - उत्पादन शुल्क व कौशल्य विकास
धनंजय मुंडे - सामाजिक न्याय
हसन मुश्रीफ - ग्रामविकास
बाळासाहेब पाटील - सहकार व पणन
राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन
राजेश टोपे - आरोग्य
जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
नवाब मलिक - कामगार, अल्पसंख्याक विकास
काँग्रेसची यादी
बाळासाहेब थोरात -महसूल
अशोक चव्हाण- सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत- ऊर्जा
विजय वड्डेटीवार- ओबीसी ,खार जमिनी,मदत आणि पुनर्वसन
के.सी.पाडवी- आदिवासी विकास
यशोमती ठाकूर- महिला व बालकल्याण
अमित देशमुख- वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
सुनील केदार- दुग्ध विकास व पशुसंवर्धन
वर्षा गायकवाड- शालेय शिक्षण
अस्लम शेख- वस्त्रोद्योग,मस्तव्यवसाय, बंदरे
सतेज पाटील- गृह राज्यमंत्री (शहर)
विश्वजित कदम- कृषी आणि सहकार राज्यमंत्री