आताची मोठी बातमी! अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी
बहुमत चाचणीत मतदान करण्याची मलिक आणि देशमुख यांना परवानगी
Maharashtra Politcal Crisis : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. ठाकरे सरकार राहाणार की जाणार याचा फैसाल आता उद्याच होणार आहे. उद्या बहुमत चाचणी घ्यावी असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे.
बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची ठाकरे सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे. दरम्यान, मंत्री नवाब मलिक आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बहुमताच्या चाचणीत मतदान करण्यासाठी परवानगी मिळावी यासंदर्भातही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
सुप्रीम कोर्टाने या दोघांनाही मतदानाची परवानगी दिली आहे. राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकी वेळीही मलिक आणि देशमुखांकडून मतदान करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. पण त्यावेळी सुप्रीम कोर्टाकडून दोघांनाही मतदानाची परवानगी नाकारली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नवाब मलिक आणि अनिल देशमुख ईडी कोठडीत आहेत.