मुंबई : एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचारी हे संपावर आहेत. तर काही कर्मचारी संपाची तलवार म्यान करुन पुन्हा सेवेत रुजु झाले आहेत. पण काही कर्मचारी हे अजूनही विलीनीकरणावर ठाम आहे. दरम्यान या एसटी संपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (maharashtra government application in mumbai high court for extension of time for submission of report of 3 member committee regarding state transport merger)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारला न्यायालयात एसटी विलीनीकरण संदर्भात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी वाढीव वेळ हवा आहे. यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.   



याआधी न्यायालयाने राज्य सरकारला हा अहवाल सादर करण्यासाठी 12 आठवड्यांचा वेळ दिला होता. मात्र तो वेळ आता संपला आहे. मात्र त्यांनतरही राज्य सरकारला हा अहवाल सादर करण्यासाठी वेळ अपुरा ठरतोय. त्यामुळे राज्य सरकारने न्यायालयात वेळ वाढवून द्यावा, असा अर्ज केला आहे


दरम्यान या अर्जावर उद्या शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर उद्या सुनावणी झाली, तर न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.