मुंबई : राज्यात गेल्या दीड वर्षात लाखो लोकं बाधित झाली, अनेक लोकांचे मृत्यू झाले. अनेक कुटुंब उद्धव्स्त झाली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांसमोर उदर निर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. या कुटुंबासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनात मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. 


ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार असून मदत नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारने यासाठी नियमावली तयार केली आहे.


तरच कुंटुबियांना मदत मिळणार?


1 - कोरोना लागण झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत मृत्यु झाल्यास मदत


2 - संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्‍तीच्या मृत्यू प्रमाणपत्रावर त्यासंबंधीची नोंद असावी. त्या रुग्णाची कोरोनासंबंधीची चाचणी होणे आवश्‍यक आहे. 


3 - मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकाला मदतीपूर्वी इतर सदस्यांचे घ्यावे लागणार नाहरकत प्रमाणपत्र


4 - तक्रार निवारणासाठी जिल्हा व महापालिका स्तरावर स्वतंत्र समिती; जिल्हा शल्यचिकित्सक असतील समन्वयक


5 - राज्य सरकार यासाठी एक वेब पोर्टल तयार करणार वेबसाईट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून काही दिवसांत त्याचे काम पूर्ण होणार आहे