Good News! मुंबई लोकलमधून प्रवास होणार अधिक आरामदायी, प्रशासन घेणार मोठा निर्णय?
Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच एक निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Mumbai Local Train News: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. पण अलीकडच्या काळात लोकलमधील गर्दी वाढत चालली आहे. गर्दी वाढल्यामुळं प्रवाशांना लोकलमध्ये चढायलादेखील मिळत नाही. तर, कित्येकदा प्रवाशांना दरवाज लटकतच प्रवास करावा लागतो. या सगळ्या समस्येवर सरकार लवकरच तोडगा काढणार आहे. सर्व लोकल गाड्या एसी लोकलमध्ये रुपांतर करण्याची योजना चर्चेत आली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारकडून लवकरच सर्व लोकलचे रुपांतर एसी लोकलमध्ये करण्यात येणार आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी प्रशासनाकडून हा प्रयत्न करण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या काळात लोकलमधील गर्दीमुळं प्रवाशांना खूप त्रास होतो. गर्दी आणि घामाच्या धाराने मुंबईकर हैराण होतात. एसी लोकलमुळं प्रवाशांचा त्रास वाचणार असून त्यांचा प्रवासही अधिक आरामदायी होणार आहे. एसी लोकलमुळं रेल्वेचे नेटवर्कमध्ये ही आधुनिकीकरण होईल.
एसी लोकलमुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील सुटेल. गर्दीमुळं व दरवाजात उभं राहिल्यामुळं अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. धावत्या लोकलमधून होणारे प्रवाशांचे मृत्यू हा गंभीर प्रश्न होता. मात्र, एसी लोकलमुळं हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एसी लोकलचे दरवाजे बंद असतात त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुरक्षित होऊ शकतात.
दरम्यान, मुंबई लोकलमधून दररोज 7.5 लाख नागरिक प्रवास करतात. जगातील सर्वात जास्त व्यस्त असलेले उपनगरीय रेल्वेचे जाळे आहे. मुंबईल लोकलचे जाळे 390 किमीपर्यंत पसरले आहेत. यात तिन प्रमुख मार्गिका आहेत. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग. या तिन्ही मार्गावर लोकल धावतात.
तुम्हाला हे माहितीये का?
भारतातील सर्वात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल 1853 साली धावली होती. तसंच, लेडिज स्पेशल ट्रेन पहिल्यांदा 1992 पासून सुरू करण्यात आल्या. महिलांची सुरक्षा आणि त्यांना आरामदायी प्रवासासाठी लेडिज स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली होती.
पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 13 फेऱ्या
पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांना वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने २७ नोव्हेंबरपासून १३ अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९ वर पोहोचली आहे.