मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहावीच्या विद्यार्थ्यांकरता सर्वात मोठी बातमी देण्यात आली आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे.  १०वी ची परीक्षा रद्द करण्यात आली असून इंटर्नल असेसमेंट बाबत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच १२ वी ची परीक्षा होणार आहे. 



त्याचप्रमाणे १५ दिवसांच्या lockdown बाबत उद्या निर्णय जाहीर करणार आहेत. बस, ट्रेन बंद करणार नाही तसेच आज नवी नियमावली बनवणार आहे. 



नवे नियम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रात्री 8 वाजता जाहीर करणार आहेत.