मुंबई : शिक्षण सेवकांची गेल्या काही वर्षांपासून रखडलेली भरती सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कोरोनामुळे सर्वच प्रकारच्या नोकरभरतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता शिक्षण सेवकांच्या भरतीला यातून वगळण्यात आलं आहे. १२ हजारांपैकी ६ हजार पदं यापूर्वीच भरण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र रखडलेल्या ६ हजार पदांवरील भरती आता सुरू करण्यात येणार आहे. अनुदानीत शाळांमधील शिक्षण सेवकांची ही भरती सुरू होणार आहे. यासंदर्भातली माहिती राज्य शासनाच्या कक्ष अधिकाऱ्याकडून राज्याच्या शिक्षण आयुक्तांना एका शासन आदेशातून देण्यात आली आहे. पवित्र पोर्टलदवारे या 6 हजार पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.