`लाडकी बहीण योजना` नोंदणीसाठी महिलांची झुंबड, असा भरा अर्ज... ही माहिती आवश्यक
Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेताल राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळतोय. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडालीय. पण अनेकांना हा अर्ज कुठे मिळणार आणि कसा भरायाची याची माहिती नाही.
Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तोंडावर महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेली महत्त्वाची योजना. मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या (Majhi Ladki Bahin Yojana) धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं ही योजना सुरू केलीय. 21 ते 65 या वयोगटातील महिलांसाठीची ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुती सरकारचा (Mahayuti Government) मास्टरस्ट्रोक मानला जातोय. या योजनेच्या नोंदणीसाठी आणि कागदपत्रं जमा करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडालीय. ही गर्दी आणि योजनेला मिळणाला उदंड प्रतिसाद पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरेल, अशी शक्यता वर्तवली जातेय..
महिलांना किती मिळणार पैसे
या योजनेनुसार, महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. याचाच अर्थ महिलांच्या खात्यात वर्षाला 18 हजार रुपये जमा होणार आहेत. 21 ते 65 या वयोगटातील विवाहित किंवा अविवाहित महिलांना योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावं, अशी अट घालण्यात आलीय. मात्र पिवळं आणि केसरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आलीय.
कुठे मिळेल योजनेचा अर्ज
राज्यातील सेतू कार्यालयं, तहसील कार्यालयं इथे अर्ज मिळवण्यासाठी महिलांची गर्दी होताना दिसतेय. योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहाता या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता 31 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरता येणार आहेत. अर्ज घेतल्यानंतर तो अर्ज जवळील अंगणवाडी केंद्रात जमा करायचा आहे.
अर्जात कोणती माहिती भरायची?
हा अर्ज उपलब्ध झाला असून यात कोणती माहिती भरायची हे देखील समोर आलं आहे. अर्ज करणाऱ्या महिलेला नाव, पत्ता, वैवाहिक माहिती, बँक अकाऊंट, जन्माचं ठिकाण इत्याही माहिती भरायची आहे. या अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यानुसार कोणती माहिती भरायची आहे ते पाहूयात...
'मुख्यमंत्री -माजी लाडकी बहिण योजना' अर्ज
1) महिलेचे संपूर्ण नाव :
महिलेचे लग्नापूर्वीचे नाव :
महिलेचे लग्नानंतरचे नाव :
2) जन्म दिनांक : दिनांक/ महिना/वर्ष
3) अर्जदाराचा संपूर्ण पत्ता :
4) जन्माचे ठिकाण :
जिल्हा-
गाव/वाहर
ग्रामपंचायत/ नगरपंचायत/ नगरपालिका-
पिनकोड
5) मोबाईल क्रमांक :
6) आधार क्रमांक :
7) शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात देणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का?
होय/नाही. असल्यास, दरमहा रु.
8) वैवाहिक स्थिती
विवाहित/ घटस्फोटीत/ विधवा/ परितत्क्या/ निराधार
9) अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बॅंकेचा तपशील :
बँकेचे पूर्ण नाव
बँक खाते धारकाचे नाव
बँक खाते क्रमाक
IFSC कोड
10) आपला आधार क्रमांक बैंक खात्याला जोडले आहे काय? होय किंवा नाही
11) Narishakti Prakar/नारीशक्ती प्रकार :
१) अंगणवाडी सेविका
२) अंगणवाडी मदतनीस
३) पर्यवेधिका
४) ग्रामसेवक
५) वार्ड अधिकारी
६) सेतू सुविधा केंद्र
६) सामान्य महिला
12) सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर/Upload करण्यात यावी,
१) आधार कार्ड
२) अधिवात/जन्म प्रमाणपत्र
३) उत्पन्न प्रमाणपत्र
४) अर्जदाराने हमीपत्र
५) बँक पासबुक
६) अर्जदाराणा फोटो
टिप : अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रांमध्ये जमा करण्यात यावा
येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत... जे मध्य प्रदेशात घडलं, त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार का? लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारला मतांची भाऊबीज मिळणार का? महिलांच्या खात्यात 18 हजार रुपये जमा करणा-या सरकारला खटाखट खटाखट मतं मिळणार का? याकडं आता लक्ष असणाराय...