CAA- NRC : विरोधकांचा विधानसभेत गोंधळ
विरोधकांनी सीएए एनपीआरचा मुद्दा उपस्थित केल्याने गोंधळ झाला.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या भारत जलाव पार्टीच्या वक्तव्यावरून विरोधकांचा विधानसभेत गोंधळ झाला. तर देशात एनसीपी व्हायरस आलाय, असा पटवार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. यावेळी सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दोघांनाही समज दिली. तसेच विरोधकांनी सीएए एनपीआरचा मुद्दा उपस्थित केल्याने गोंधळ झाला.
विधानसभेत अनुदानाच्या खातेनिहाय मागण्यांवर चर्चा सुरु असतानाच विरोधकांनी सीएए एनपीआरचा मुद्दा उपस्थित केल्याने गोंधळ झाला. सीएएचा मुद्दा अचानक का उपस्थित केला, असा आक्षेप सत्ताधाऱ्यांनी घेतला. प्रस्ताव येईल तेव्हा त्यावर चर्चा करु असे संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी सांगितले. तर महत्वाच्या मुद्दा उपस्थित केला तर त्यात गैर काय, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मागासवर्गीयांना आरक्षणानुसार पदोन्नती देण्याचे सरकार अनुकूल असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. विधान परिषदेत आमदार हरीसिंह राठोड यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उद्धव ठाकरेंनी हे उत्तर दिलंय. सुप्रीम कोर्टानं सरकारी नोकरीत बढतीत आरक्षण दिला जात नसल्याचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलं. हा प्रश्न कोर्टात आहे, कोर्टात सरकारनं वकिलांची फळी उभी केलीय. कोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या पाच वर्षांत बढतीत आरक्षण का दिलं नाही हे तपासणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोना वायरसच्या समस्येमुळे अधिवेशन लवकरत संपवत आहोत. त्यामुळे 'दिशा'च्या धर्तीवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा या अधिवेशनात आणू शकत नाही. मात्र मुख्यमंत्री यांच्या परनावगीनंतर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन भरवण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदमध्ये निवेदन दिले.