मुंबई : विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. तशी घोषणा  केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. यात नाशिक, कोकण, अमरावती, परभणी-हिंगोली, तसंच उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्थाचा समावेश आहे. या निवडणुकीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यात भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांवर अधिक प्रतिनिधी कसे निवडून येतील, यावर भर देताना दिसत आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.  स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातल्या उमेदवारांसाठी ही निवडणूक होत आहे. नाशिक, कोकण, अमरावती, परभणी-हिंगोली, तसंच उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे.


 यातील पहिल्या तीन जागा राष्ट्रवादीच्या, चौथी जागा काँग्रेस आणि शेवटच्या दोन जागा भाजपच्या ताब्यात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बदललेले राजकीय गणित लक्षात घेता भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्या जागा कायम राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहे. त्यामुळे यात कोण वरचढ होतो, याची उत्सुकता आहे.