मुंबई : पहिल्याच मान्सूनच्या पावसाने मुंबईला झोडपून काढले आणि मुंबईकरांची दाणादाण झाली. संध्याकाळी पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र, रात्री मालाड भागात मोठी दुर्घटना घडली. चार मजली इमारत कोसळून एकाच कुटुंबातील 11 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला. सुदैवाने या कुटुंबातील एक जण वाचला आहे. मोहम्मद रफी हे दूध आणायला रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले. ते घरी परतल्यानंतर त्यांना समोरचे दृश्य पाहून मोठा धक्काच बसला. रात्री 11.10 वाजण्याच्या दरम्यान आपले राहते घरच जमीनदोस्त झाले होते. ते थोडे घाबरतच पुढे झाले आणि पाहतो तर काय, आपण आपले कुटुंबच गमावल्याची मोहम्मद रफी यांना जाणीव झाली आणि त्यांनी एकच टाहो फोडला आणि त्याठिकाणी सन्नाटा पसरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद रफी यांनी सांगितले की, माजी पत्नी, भाऊ, भावजय आणि परिवारातली सात मुलं गमावली आहेत. ही घटना घडली त्यावेळी मी स्वतः दूध खरेदी करण्यासाठी बाहेर गेलो होतो. त्याचवेळी इमारत कोसळली. आता मी आणलेले दूध कोणाला देऊ, याचा काय उपयोग, असे म्हणत मोहम्मद रफी यांनी दु:खाला वाचा फोडली. माझ्या डोळ्यादेखत माझं संपूर्ण कुटुंब गेले, हे मी आता कसे पचवू, असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले होते.


मालाडच्या मालवणी भागात झालेल्या बिल्डींग दुर्घटनेत 11 जणांचा बळी गेलाय. त्यातील 9  जण हे एका कुटुंबातले आहे. या कुटुंबातील 9 मृतांमध्ये 7 मुलांचा बळी गेलाय. यात 4 मुली आणि 3 मुलांचा समावेश आहे. मोहम्मद रफी या स्थानिकांचं हे संपूर्ण कुटुंब यात बळी पडलंय. रफी यांची पत्नी, भाऊ, भावजय आणि परिवारातली 7 मुले या अपघातात मृत्यूमुखी पडली. हा प्रकार घडला तेव्हा मोहम्मद रफी हे स्वतः दूध खरेदी करण्यासाठी बाहेर गेले होते. त्याच वेळी बिल्डींग कोसळली. डोळ्यादेखत रफी यांचे संपूर्ण कुटुंब मृत्यूमुखी पडले. 



मुंबईत मालवणी भागात रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी इरामत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्यात अजूनही शोधकार्य सुरू आहे. ही एक मजली धोकादायक अवस्थेत होती. ही एक मजली अनधिकृत इमारत असल्याची माहिती मिळत आहे. या इमारतीवर आणखी दोन मजले चढवण्यात आले होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या बिल्डींगच्या शेजारी असलेली तीन मजली इमारतही धोकादायक स्थितीत आहे. या बिल्डींगमधील रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. इमारत शेजारी असणाऱ्या घरांवर कोसळली असून अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण दबले असल्याची भीती असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.


स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करत जखमींना कांदिवलीमधील रुग्णालयात नेण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 17जखमींना आणण्यात आले होते. यामधील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. इतर आठ जणांवर उपचार सुरु आहेत.