मुंबई :  महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्ड्रींगप्रकरणी (money laundering) ईडीने (ED) अटक केली. बुधवारी 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, नवाब मलिक यांना मुंबईतल्या जे जे रुग्णालयात (JJ Hospital) दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना आज तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आलं. पोटदुखीची समस्या वाढल्याने नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


नवाब मलिक ईडी कोठडीत
मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर याच्या चौकशीदरम्यान नवाब मलिक यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर 23 फेब्रुवारीला सकाळी ईडीचे अधिकारी मलिक यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक अटक करण्यात आली. 


मनी लॉण्ड्रींग प्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली असून गुन्हेगारांशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 


काय आहे नेमकं प्रकरण? 
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतोय, आणि कशा प्रकारे हे रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून होतायत, यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने  (ED) धाडी टाकल्या. यातीलच एक प्रकरण मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. मंत्री नवाब मलिक यांनी जी काही जमीन घेतली आहे. ती बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान आणि सरदार पटेल जो हसीना पारकरचा राईट हँड आहे. आणि ज्याला हसीना पारकर (Haseena Parkar) दाऊदच्या प्रॉपर्टी  बिझमेसमध्ये फ्रंट मॅन वापरत होती. त्यांच्याकडून ही जमीन त्यांनी घेतली, असा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे.