कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. कोरोनाच्या संकटामुळे एक किंवा दोन दिवसच अधिवेशन घेण्याचा सरकारचा विचार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिवेशन घ्यायचं का सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळीन सदस्यांनी प्रत्यक्ष हजर राहून अधिवेशन घ्यायचं, याचा निर्णय कामकाज सल्लागार समिती घेणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक मंगळवारी होणार आहे. 


एक किंवा दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनात केवळ महत्वाचे विषयच घेतले जाणार आहेत. तसंच एक दिवस कोरोनाच्या संकटावर चर्चा ठेवली जाण्याची शक्यता आहे.