मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊसाने (Maharashtra Monsoon Update)   दडी मारलेली आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली. पावसाने दडी मारल्याने काही भागात तर दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ आली. मात्र आता काहीशी दिलासादायक बातमी आहे. दडी मारुन बसलेला पाऊस उद्यापासून (29 ऑगस्ट) 4 ते 5 दिवस राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Monsoon Update Heavy to very heavy rains from 29 August to 2 September 2021 Meteorological Department forecast)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या जिल्ह्यांमध्ये ऑरेन्ज अलर्ट


राज्यात 30 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम आणि मध्य भारतातून प्रवासाच्या शक्यतेमुळे राज्यात येत्या चार ते पाच दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.