सागर कुलकर्णी, झी मीडिया,मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने उद्या म्हणजे 17 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता समूह राष्ट्रगीत गायन केलं जाणार आहेत. नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने याबाबत एक अध्यादेश काढला आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन राज्यसरकारतर्फे करण्यात आलं आहे. 


राज्यातील खासगी, शासकीय तसंच इतर सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था विद्यापीठांमधील शिक्षक विद्यार्थी सहभाग असणार आहे. तसंच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. 


केंद्राचं हर घर तिरंगा अभियान
स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात आलं होतं. त्याला देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता.