मुंबई : मनसेप्रमुख (Maharashtra Navnirman Sena) राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची (Corona) बाधा झाली आहे. राज यांच्यासह त्यांच्या आईनाही कोरोना झाला आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची पुष्टी केली आहे. राज आणि त्यांच्या आईंना कोरोनाची सौम्य लक्षणं असून ते घरीच उपचार घेत आहेत. (Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray and his mother Tested Corona Positive)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज यांची काही दिवसांपासून प्रकृती स्थिर नव्हती. त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली होती. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांना सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे ते  आणि त्यांच्या मातोश्री हे घरीच उपचार घेत आहेत. दरम्यान आता राज ठाकरे यांना कोरोना झाल्याने अनेक बैठका आणि मेळावे हे स्थगित करण्यात आले आहेत.   


अनेक ठिकाणी राज ठाकरे विनामास्क 


कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सर्वांना मास्क बंधनकारक करण्यात आला. मात्र राज ठाकरे हे अनेकदा विविध बैठकांमध्ये तसेच दौऱ्यांमध्ये विनामास्क असल्याचं दिसून आले होते. यावरुन राज ठाकरे यांना फेब्रुवारी 2021 मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. "मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतो", असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं होतं.