मनविसेत खांदेपालट, युवा चेहऱ्यांना संधी देत `नवनिर्माण`चा ध्यास
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मनविसेच्या पुनर्बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मनविसेच्या पुनर्बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. अमित ठाकरे यांनी पहिल्याच टप्प्यात विद्यार्थी सेनेचे 7 विभाग अध्यक्ष बदललेत. तर निवडक ठिकाणी विभाग अध्यक्षांची फेरनिवड केली आहे. तसेच नव्या विभाग अध्यक्षांपैकी बहुतेक पदाधिकारी हे मनविसेच्या दुसऱ्या फळीत आहेत. तर नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली आहे (maharashtra navnirman student union president amit thackeray appoints office bearers in some assembly constituencies in mumbai)
अमित यांनी 15 विधानसभेतील मनविसेच्या 15 विभाग अध्यक्षांपैकी 7 विभाग अध्यक्ष बदलले आहेत. तर 3 जणांची फेर निवड केली आहे. तर उर्वरित 5 विधानसभा साठीच्या नेमणुका पुढच्या आठवड्यात करण्यात येणार आहे.
मनविसेचे मुंबईतील नवीन चेहरे - नवीन विभाग अध्यक्ष :
वरळी - वैभव मांजरेकर
मानखुर्द - प्रकाश हंगारगे
घाटकोपर पूर्व - रोहन अवघडे
घाटकोपर पश्चिम - समीर सावंत
विक्रोळी - प्रथमेश धुरी
मुलुंड - प्रवीण राऊत
भांडूप- प्रतीक वंजारे
मनविसेचे विभाग अध्यक्षपदी फेरनिवड झालेले उमेदवार
वडाळा - ओमकार बोरकर
श्रीमती मीनल सोनावणे (विद्यार्थीनी)
शिवडी - उजाला यादव
माहीम - अभिषेक पाटील
अमित ठाकरे गेल्या काही दिवसांत मुंबईतील 15 विधानसभा मतदारसंघातील मनसे पक्ष कार्यालयांना भेट दिली. तसेच मनविसेच्या पदाधिकारी आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान
मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान मुंबईतील एकूण 36 विधानसभा मतदासंघामध्ये राबवण्यात येत आहे. प्रत्येक विभागात अमित यांना किमान 200 पेक्षा अधि विद्यार्थी भेटायला येतायेत. आतापर्यंत अमित यांनी ३ हजार विद्यार्थ्यांशी वैयक्तिक तसंच गटागटाने संवाद साधला आहे. अमित ठाकरे मनविसेचे अध्यक्ष झाल्यापासून मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहायला मिळतोय.