राज्यातील घडामोडींना वेग! देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन
सत्तास्थापनेच्या दृष्टीने भाजपकडून जोरदार हालचाली
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) उद्या बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. दुसरीकडे भाजपकडूनही (BJP) सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
यासाठी एक एक महत्त्वाचं आहे, या अनुषंगाने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना फोन केला. मतदानात मनसेने भाजपाला सहकार्य करावं यासाठी फडणवीस यांनी राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती आहे.
मनसेकडून (MNS) भाजपाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती आहे. त्यामुळे मनसेच्या एकमेव आमदाराचं मत भाजपाच्या पारड्यात पडणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. तर एकनाथ शिंदे गटही हिंदुत्त्वाच्या मुद्यावर सरकारमधून बाहेर पडले आहेत. भाजपही हिंदुत्त्वाचा मोठा चेहरा आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावर भविष्यात हे तीनही पक्ष एकत्रित येणार का? याकडेही लक्ष लागलं आहे.
भाजपाची महत्त्वाची बैठक
भाजपा आमदारांची संध्याकाळी पाच वाजता ताज प्रेसिडेट हॉटेलमध्ये बैठक होतेय. उद्याच्या विश्वास दर्शक ठरावावर रणनिती आखण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. आमदारांसोबत भाजप नेते चर्चा करणार आहेत. या बैटकीसाठी सर्व भाजप आमदारांना मुंबईत बोलावण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस - चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यासह अनेक नेते यावेळेस उपस्थितीत राहणार आहेत.