Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर आज संध्याकाळी उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना आमदारांच्या बंडानंतर मुख्यमंत्रीपदाचा आणि शिवसेना पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी दाखवलीय.  शिवसेनेच्या आमदारांनाच आपण मुख्यमंत्रीपदी नको असू, तर त्यांनी सरळ समोर येऊन सांगावं, आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केलं.


मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागलं होतं. आता एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, 


१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.


२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. 


३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.


४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.


यासोबतच एकनाथ शिंदे यांनी #HindutvaForever असा हॅशटॅगही दिला आहे.