मुंबई : मुंबई महापालिका (Bmc Election 2022) काबीज करण्याचा विडा भाजपनं उचललाय. त्यादृष्टीनं युतीसाठी (Shiv Sena) शिवसेनेऐवजी मनसेचा पर्याय भाजपकडं (MNS-BJP) उपलब्ध आहे. राज ठाकरेंनी गेल्या काही महिन्यांपासून घेतलेली कट्टर हिंदुत्वाची भूमिका पाहता मनसे आणि भाजपची सोयरिक जुळण्याची शक्यता आहे. युतीची चर्चा झालेली नाही. मोदी-शाहाचं युतीचा निर्णय घेतात, असं भाजपकडून सांगितलं जातंय. पण हे सांगताना राज ठाकरेंची (Raj Thackeray) आरती ओवाळायला ते विसरत नाहीत. (maharashtra political crisis bjp state president on allaince with raj thackeray party mns)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीची बातमी.  मग भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी शिवतीर्थवर जाऊन घेतलेली भेट. आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा राज ठाकरेंच्या घरी पाहुणचार. गेल्या दोन दिवसांत राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 



बावनकुळे शिवतीर्थवर मीडियाशी बोलत असताना, राज ठाकरे पाठीमागे हाताची घडी घालून शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होते. तूर्तास युतीबाबत हाताची घडी आणि तोंडावर बोट, अशीच मनसेची भूमिका असल्याचं त्यातून स्पष्ट होतंय.


गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौ-यावर येणार आहेत. त्याआधी भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंशी भेटीगाठी वाढल्यात. 


युतीच्या दृष्टीनं प्राथमिक तयारी सुरू झाल्याची चर्चा आता रंगू लागलीय. आधीच एकनाथ शिंदेंच्या रुपानं भाजपनं पडद्याआडून शिवसेनेला जोर का झटका दिलाय. मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी मनसेशी युती करून शिवसेनेच्या वर्मावर शेवटचा घाव घालण्याची तयारी भाजपच्या चाणक्यांनी चालवल्याचं समजतंय.