मुख्यमंत्री मंत्रालयाच्या दिशेने रवाना, महाविकास आघाडीची शेवटची मंत्रिमंडळाची बैठक?
Maharashtra Political Crisis : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला (Maharashtra State Cabinet Meeting) संध्याकाळी 5 वाजता मंत्रालयात सुरुवात होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार आहेत.
मुंबई : राज्यात सत्तानाट्याला वेग आला आहे. यातच आता थोड्या वेळात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला संध्याकाळी 5 वाजता मंत्रालयात सुरुवात होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी मुख्यमंत्री ठाकरे मातोश्रीवरुन मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेना 3 नामांतरांवर ठाम आहे. त्यामुळे ही मंत्रिमंडळ बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. (maharashtra political crisis cm uddhav thackeray departure from matoshri towards mantralaya for state cabinet meeting)
या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेना 3 नामांतरांवर ठाम आहे. त्यामुळे ही मंत्रिमंडळ बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. महाविकास आघाडी अस्थिर आहे. त्यामुळे राज्य सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शिवसेना या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
या बैठकीत बहुप्रतिक्षित औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराबाबत निर्णय बोऊ शकतो. तसेच नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाला दि बा पाटील यांचं नावही निश्चित केलं जाऊ शकतं. त्यामुळे आता या बैठकीत या नामांतराबाबत नक्की काय निर्णय होणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.