कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून (Maharashtra Political Crisis) अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवारी 5 ऑगस्टला तातडीची बैठक पार पडणार आहे. ही बैठक कुठे आणि कधी होणार आहे, हे अजूनही ठरलेलं नाही. (maharashtra political crisis eknath shinde group 50 mla meetinhg will held friday 5 august over to development works)


बैठकीचा  विषय काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार,  या बैठकीत शिंदे समर्थक आमदारांच्या मतदारासंघातील विविध विकास कामांसंदर्भात तसंच संघटनात्मक बांधणीबाबतही चर्चा होणार आहे. असं जरी असलं तरी या बैठकीमागील कारण दुसरंच असल्याचीही चर्चा रंगली आहे.


नक्की चर्चा काय?


राज्यात नवं सरकार येऊन महिना उलटलाय. मात्र मंत्रिमंडळ विस्तार अजून झालेला नाही. आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार हा 5 आणि  8 ऑगस्ट या दोन्हीपैकी एका तारखेला  होणार असल्याची चर्चा होती. मात्र राज्यातील सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी ही 8 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे 5 आणि 8 ऑगस्ट या दोन्ही दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचं म्हटलं जात आहे.


त्यामुळे एकनाथ शिंदे गटातील 50 आमदारांच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.