आताची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार?
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांचं ट्विट चर्चेत
Maharashtra Political Crisis : 11 जुलैपर्यंत सरकारविरोधात अविश्वास ठराव आलाच तर त्याविरोधात कोर्टात धाव घेण्याची मुभा द्यावी अशी मविआच्या वकिलांची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा मार्ग मोकळा झालाय.
शिंदे गटात त्यादृष्टीनं हालचाली सुरू झाल्या आहेत. गुवाहाटीतून एकनाथ शिंदे आज मुंबईत येण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची ते भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचीही माहिती आहे. राज्यापालांच्या भेटीत आपल्याबरोबर किती आमदार आहेत, कशाप्रकारे सत्ता स्थापन करता येईल, याबाबत सविस्तर माहिती ते राज्यपालांना देतील.
एकनाथ शिंदे गटाकडून मविआ सरकारविरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. आता सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून शिंदे गटाकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात सरकारला बहुमत सिद्ध कऱण्याच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागू शकतं.
एकनाथ शिंदे यांचं ट्विट चर्चेत
दरम्यान, सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!