मुंबई : महाराष्ट्रात होणारी मंत्रिमंडळाची बैठक आता सायंकाळी 5 वाजता होणार आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आता मुंबईहून दिल्लीत पोहोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांनी आज रेडिसन ब्लू हॉटेलच्या मुख्य गेटवर येऊन पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही शिवसेनेत असून वेगळा पक्ष काढणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ते बाळासाहेब आणि हिंदुत्वाला पुढे घेऊन जात असल्याचे शिंदे म्हणाले. दीपक केसरकर हे त्यांचे प्रवक्ते असल्याचे ते म्हणाले.


त्यांचे पुढचे पाऊल काय असेल, ते लवकरच कळवले जाईल, असे शिंदे म्हणाले. आम्ही लवकरच मुंबईला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्यासोबत एकूण 48 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला.


महाराष्ट्राचे राजकीय संकट आज नवे वळण घेऊ शकते. सरकार स्थापनेसाठी बंडखोर आमदार भाजपसोबत चर्चा करत आहेत. यासंदर्भात आज दिल्लीत मोठी बैठक होणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. ते अमित शहा यांची भेट घेऊ शकतात. तसेच पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची ही भेट घेणार आहेत..


शिंदे गटाचे अपक्ष आमदार महाराष्ट्राच्या राज्यपालांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा काढून घेत असल्याचे सांगू शकतात. हे पत्र 10 आमदार लिहू शकतात.


यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर गटाला 12 जुलैपर्यंत एकप्रकारे दिलासा दिला आहे. दुसरीकडे, आज आणखी एक-दोन आमदार जाऊन बंडखोर गटात सामील होऊ शकतात. याशिवाय, आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील अॅक्शन मोडमध्ये आहेत. उद्धव सरकारने गेल्या काही दिवसांत घेतलेल्या निर्णयांच्या फायली त्यांनी मागवल्या आहेत.