मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मोठा मास्टर स्ट्रोक लगावला आहे. फडणवीस यांनी राजभवनातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची अनपेक्षिपणे घोषणा केली. एकनाथ शिंदे यांच्या गटापेक्षा अधिक आमदार असतानाही फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचं नाव जाहीर केलं. विशेष म्हणजे फडणवीस मंत्रिमंडळातही सहभागीही होणार नाहीत. यासह फडणवीस पत्रकार परिषदेत काय काय म्हटलं हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (maharashtra political crisis know top points in devendra fadnvis press confrence at raj bhavan)


फडणवीस काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"विधानसभेसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती होती. भाजपा 105 जागा जिंकली, तर शिवसेना 56 जागांवर जिंकली. अशा 161 जागा आम्ही जिंकलो. अपक्ष मिळून 2019 साली युतीचे 170 आमदार निवडून आले. तेव्हा शिवसेना भाजपा युतीचं सराकर येईल असं वाटत होतं. जनतेनं भाजपा आणि शिवसेनेला कौल दिला होता. परंतु दुर्दैवाने शिवसेना नेतृत्वाने वेगळा निर्णय घेतला. ज्यांनी हिंदुत्वाचा अपमान केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. भाजपाला सत्तेबाहेर ठेवलं. जनतेनं मत महाविकास आघाडी सरकारला दिलं नव्हतं. ते भाजपा सेना युतीला मत दिलं होतं. महाविकास आघाडी सरकारनं जनमताचा अपमान केला आणि सरकार स्थापन केलं. गेल्या अडीच वर्षात कुठलीही नविन विकास योजना नाही. मविआच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला", अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. एकनाथ शिंदे यांना भाजपा पूर्ण सहकार्य करेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


"महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात जाणं, ही खेदजनक गोष्ट होती.  बाळासाहेब ठाकरे यांनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंधित दुसरा मंत्री जेलमध्ये जातो आणि त्याला मंत्रिपदावरून देखील काढलं नाही. एकूणच रोज सावकरांचा अपमान, रोज हिंदुत्वाचा अपमान..शेवटच्या दिवशी संभाजीनगर झालं. पण केव्हा झालं जेव्हा गव्हर्नरचं पत्र आलं तेव्हा..जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव येत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची नसते तेव्हा. जाता जाता संभाजीनगर, धाराशिव, दिबा पाटील अशा प्रकारचे निर्णय घेतले. पण येणाऱ्या सरकारला हे निर्णय परत घ्यावे लागतील. कारण ते वैध मानले जाणार नाही, पण आमचं त्याला समर्थनच आहे.", असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.