मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना उत आला आहे. कधी राजकीय भूकंप होऊन सत्तांतर होईल काही सांगता येत नाही. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेच्या डोकेदुखीत प्रचंड वाढ झाली आहे. राज्यातील राजकीय समीकरणाबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. या दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं. विशेष म्हणजे अमृता फडणवीस (Amruta Fadnvis ) यांनी केलेलं ट्विट अवघ्या काही मिनिटांमध्ये डिलीटही केलं. (maharashtra political crisis lop devendra fadnvis wife amruta fadnvis tweet deleted in few minitues)


अमृता फडणवीस ट्विटमध्ये काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एक 'था' कपटी राजा' असं ट्विट अमृता फडणवीस यांनी 8 वाजून 35 मिनिटांनी केलं होतं. मात्र अवघ्या काही क्षणात त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. अमृता फडणवीस या सातत्याने राजकीय परिस्थितीवर ट्विट करत असतात. ट्विटच्या माध्यमातून ते आपलं मत मांडत असतात. मात्र आता त्यांनी हे ट्वीट डिलीट केल्याने या ट्विटची चर्चा अधिक रंगली आहे.