मुंबई : Poster in support outside Sanjay Raut: शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर लावण्यात आलेले एक पोस्टर सध्या जोरदार चर्चेत आहे. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर लिहिले आहे, 'तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खांदानी है !'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले आहे. हे पोस्टर आता जोरदार चर्चेत आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे चांगले मित्र आहेत. आमचं त्यांच्याशी सतत बोलत असतो, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे या पोस्टरवरुन कोणाला टोला लगावण्यात आलाय, याचीही चर्चा सुरु आहे.


शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीला 


महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गुजरातमधील सूरत येथून आसाममधील गुवाहाटी येथे स्थलांतरित झाले आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 33 आमदार आणि 6 अपक्ष आमदारही गुवाहाटीला पोहोचले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला असून त्यात शिवसेनेचे 34 आणि 6 अपक्ष आमदार आहेत.



एकनाथ शिंदे राज्यपालांना पत्र फॅक्स करु शकतात!


एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणी वाढवल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना फॅक्स पत्र पाठवू शकतात. या पत्राद्वारे शिंदे 40 आमदारांचा पाठिंबा महाविकास आघाडी सरकारला नसल्याचा दावा करु शकतात. यानंतर, या पत्राच्या आधारे, राज्यपाल फ्लोर टेस्टवर निर्णय घेऊ शकतात, जिथे उद्धव सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल. 


राज्यपाल कोश्यारी कोरोना पॉझिटिव्ह


महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय गदारोळात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भगतसिंह कोश्यारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर नवा ट्विस्ट आला आहे.