मुंबई :  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला (Shiv Sena) मोठी गळती लागली. तब्बल 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. राज्यातील महाविकास आघाडी कोसळून राज्यात सत्तांतर झालं. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला संघटनात्मक पातळीवरही खिंडार पडलं. या सर्व राजकीय भूकंपानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुखपत्र 'दैनिक सामना'ला मुलाखत दिली आहे. संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. राऊत यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (maharashtra political crisis sanjay raut given shiv sena party chief uddhav thackeray interviewed telecast  to 26 and 27 july)



ट्विटमध्ये काय म्हटलंय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याला उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीमधून सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तर मिळतील, असं राऊतांनी म्हटंलय. ही बहुप्रतिक्षित मुलाखत 26 आणि 27 जुलैला पाहायला मिळणार आहे.  राऊत यांनी या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपलाही मेन्शन केलंय.


त्यामुळे आता उद्धव ठाकरे या मुलाखतीत कोणत्या मुद्द्यावर काय बोललेत, त्यांची पुढील भविष्यातील राजकीय वाटचाल कशी असणार आहे, याबाबत सर्वांनात उत्सुकता लागली आहे.