Maharashtra Political Crisis : राज्यात शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला असतानाच आता सत्तासंघर्षाच्या या संपूर्ण नाट्याला एक नवं वळण मिळालं आहे. त्यातच नव्या सरकारवर असणारी टांगती तलवार काही दूर झालेली नाही, कारण महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर पडली आहे. (Maharashtra Political Crisis  supreme court postponed till 12 july Eknath Shinde shivsena)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि ठाकरेंनी केलेल्या विविध याचिकांवर आणि आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी आता थेट 22 ऑगस्टला होणार आहे. आधी ही सुनावणी सुप्रीम कोर्टात 12 ऑगस्टला होणार होती. 


सणवार आणि आठवड्यातल्या विविध सुट्ट्या या कारणांमुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी लांबल्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट यांची धाकधूक वाढली आहे. 


नेमकं प्रकरण काय? 
शिवसेनेच्या चिन्हावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला. शिवसेना पक्षावर दोन्ही गट दावा करत असतानाच नेमका दावा कोणाचा योग्य हे ठरवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नोटीस बजावली होती. 


नोटीसनंतर शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शिवसेनेतील अंतर्गत वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावरून शिंदे गटातील आमदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.