सागर कुलकर्णी / मुंबई : Maharashtra Political Crisis :  राजकीय सत्तानाट्याला जुलैचा पहिला आठवडा उजाडणार आहे. एकनाथ शिंदे गटाचा निर्णय होईपर्यंत भाजपने सावध पवित्रा घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंग सुटण्यास वेळ लागणार आहे, असे संकेत मिळत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 एकनाथ शिंदे यांचा बंड आणि मूळ शिवसेना गट दावा यावरुन पुढील काही दिवस संपूर्ण प्रकरण विधीमंडळ आणि न्यायालयात वेळ लागण्याची शक्यता आहे. राजकीय सत्तानाट्याला जुलैचा पहिला आठवडा उजाडणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय पेच प्रसंगाला वेळ लागेल. त्यामुळे बंडखोरांच्या निलंबनाबाबत काय निर्णय याकडे लक्ष आहे. शिंदे गटाचा निर्णय होईपर्यंत भाजपचा सावध पवित्रा दिसून येत आहे.


शिंदेंचं गटनेते पद ग्राह्य धरले नाही तसेच शिंदे गटाचे आमदार निलंबन विधीमंडळाने केले तर याबाबत शिंदे सर्वोच्य न्यायलायातून दाद मागतील. दुसरीकडे शिंदे यांच्या बाजूने निकाल लागला तर शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे त्या विरोधात कोर्टात भूमिका मांडून दाद मागतील, अस म्हटले जात आहे. 


महाराष्ट्रातील सत्तानाट्य, बंडखोरी आणि मग पुढे काय? याचा निकाल लागण्यास आता वेळ लागणार आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांचा बंड आणि मूळ शिवसेना गट दाव्यावरुन पुढील काही दिवस संपूर्ण प्रकरण विधीमंडळ आणि न्यायालयात वेळ लागणार आहे. राज्यातील राजकीय पेचप्रसंग संपायला अजून आठवडा जाणार असल्याचे राजकीय तज्ज्ञ मंडळीच मत आहे. शिंदे यांचे गटनेते पद ग्राह्य धरले नाही तेच शिंदे गटाचे आमदार निलंबन विधीमंडळाने केले तर याबाबत शिंदे सर्वोच्य न्यायलायातून दाद मागतील. 


या सर्व प्रक्रियेला न्यायालयात किती कालावधी लागेल हे निश्चित सांगता येत नाही. यामुळे महाविकास आघाडी राजकीय अस्थिरता, एकनाथ शिंदे यांचा राजकीय बंड आणि पुढील निर्णय याला जुलै महिना उजाडण्याची शक्यता आहे. तोपर्यत शिंदे गट नेता आणि निलंबित आमदारकी याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत भाजपही किती समोर येईल या विषयी शंका आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय नाट्य आता विधीमंडळ, न्यायालयात राहील. त्यामुळे संपूर्ण चित्र आणि नवीन राजकीय सत्तानाट्याला जुलैचा पहिला आठवडा उजाडणार आहे.