Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सध्या राजकीय संकटाचा सामना करत आहे. गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदार थांबले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे गटाने आपल्यासोबत 50 हून अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. यापैकी शिवसेनेचे जवळपास 40 आमदार आहेत. महाराष्ट्रातील या सर्व राजकीय घडामोडींमध्ये भाजपच्या भूमिकेवरही सर्वाचं लक्ष आहे. भाजपशासित राज्यातील गुवाहाटीमधील बंडखोर आमदारांना ठेवण्यात आलं आहे. यासोबतच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोर कमेटीची बैठक होत आहे.


महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर सरकार स्थापनेच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की भाजपकडे प्लॅन-बी आहे, ज्याच्या मदतीने मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे सरकार पडले होते.


ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदारांनी ज्याप्रमाणे पक्ष आणि विधिमंडळाचा राजीनामा देऊन कमलनाथ यांचे सरकार पाडले होते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदारही तेच करू शकतात. या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात जाईल आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार नाही. भाजपला सरकार स्थापनेचा दावा करण्याची संधी आहे. महाराष्ट्रात पोटनिवडणूक होणार असून या निवडणुका जिंकून भाजप पुन्हा या आमदारांना निवडून आणेल.


शिंदे गटाचा शिवसेनेवर दावा


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे बंडखोर आमदार सातत्याने पक्षावर दावा करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वावर चालणारे शिवसैनिक असल्याचे ते सांगतात. शिवसेनेवर सत्ता मिळवण्याचा मार्ग बंडखोरांसाठी सोपा नाही. अशा स्थितीत हे आमदार विधानसभेत वेगळ्या गटाचा दावा मांडू शकतात. त्यानंतर भाजपशी करार करून सरकार स्थापन करता येईल. त्यातही ते अपयशी ठरले तर त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहणार नाही.


एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या ही अधिक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी किती प्रयत्न करावे लागतील, हे दिसून येते. शिवसेनेच्या अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे की पक्षासाठी मुख्य चिंतेची बाब ही आहे की बहुतांश बंडखोर हे केवळ त्यांच्या मतदारसंघातच नाहीत, तर जिल्ह्यांमध्ये पक्ष मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.


बंडखोर आमदारांपैकी किमान आमदारांनी तीनदा निवडणुका जिंकल्या आहेत. स्थानिक कार्यकर्ते ठाकरे यांच्याशी संबंध बिघडले तरी त्यांची साथ सोडणार नाहीत. यापैकी अनेक बंडखोरांनी त्यांच्या भागात शिवसेना बळकट करण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे अशा मतदारसंघात पक्षाची बांधणी करणे हे मुख्यमंत्र्यांसाठी कठीण काम असेल.