Sanjay Raut on BJP : शिवसेना फोडणे हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांचं स्वप्न नव्हते तर ते भाजपचे (BJP) होते.  (Maharashtra Political News ) हे राष्ट्रीय धोरण भाजपचे आहे. या कटात ते सामील झाले आहेत.  (Maharashtra Politics News) आता राज्यातल्या घटनाबाह्य सरकारचा (Maharashtra Politics Crisis News) मृत्यू ठरलेला आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केलीय. वेळेत निकाल लागला तर फेब्रुवारीपर्यंत हे सरकार कोसळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Maharashtra Political : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी


राऊत पुढे म्हणाले, आम्ही तारखांना सामोरे जात आहोत.आणि सरकार मिश्कीलपणे हसतंय अशी टीका त्यांनी केली. आमचा न्यायमूर्तींवर विश्वास आहे असं राऊत म्हणाले. लोकशाहीत कोणते आदर्श निर्माण करणार आहेत हे या प्रकरणातून जगासमोर येणार आहे. त्याचेवळी राज्यातल्या सत्तासंघर्षाबाबत आज सुप्रीम कोर्टात होत असलेल्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच संजय राऊत यांनी सूचक ट्वीट केलंय. मन मे हमेशा जीत की आस होनी चाहिये, नसीब बदले या ना बदले, वक्त जरूर बदलता है अशी कॅप्शन असलेला फोटो राऊतांनी ट्वीट केलाय. 


'आम्ही सत्याच्या पलिकडे काहीच मागत नाही'


तर दुसरीकडे राऊत म्हणाले, कोणत्याही दबावाखाली स्वायत्त संस्थानी येऊ नये. या देशात न्याय व्यवस्था आहे की नाही हे या केस वरुन दिसून येईल. आम्ही सत्याच्या पलिकडे काहीच मागत नाही. लोकशाहीत कोणते आदर्श निर्माण करणार आहेत हे या प्रकरणातून जगासमोर जाणार आहे. घटनाबाह्य पद्धतीनं पक्ष फोडण्यात आला.


महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक असुरक्षित राज्य झालं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. आता सरकार आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करतील, असा दावा त्यांनी केला. आम्ही अधिवेशनात काढलेली प्रकरणे ईडीला दिसत नाहीत का, असा सवाल राऊत यांनी केलं. 


कोणत्याही दबावाखाली स्वायत्त संस्था येऊ नये. या देशात न्याय व्यवस्था आहे की नाही हे या केस वरून दिसून येईल. आम्ही सत्याच्या पलिकडे काहीच मागत नाही. लोकशाहीत कोणते आदर्श निर्माण करणार आहेत हे या प्रकरणातून जगासमोर जाणार आहे. घटनाबाह्य पद्धतीनं पक्ष फोडण्यात आला आहे. एक शहाणे मंत्री म्हणाले मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा. मात्र, या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे. मुर्द्यात गुंतवलेला प्राण आहे. त्या मंत्र्यांनी कानात बोळे घातले आहेत का, असा सवाल राऊत यांनी विचारला.


'राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार'


देशात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून चांगला संदेश देत आहेत. राहुल गांधी यांच्या सोबत मी भारत जोडोमध्ये मी सहभागी होणार आहे. यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात येईन असं मी म्हणालो होतो. राहुल गांधींचा इव्हेंट नाही. ही ऐतिहासिक गोष्ट आहे. राहुल गांधी यांच्या सोबत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. आता मी सहभागी होणार आहे, असे राऊत म्हणाले.