Mahrashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच अवघ्या चार तासात शरद पवार यांनी घुमजाव केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते आहेत ही असं मी बोललो नाही, ही माध्यमांची चूक असल्याचं आता शरद पवार यांनी म्हटलं आहे. संधी सारखी मागायची नसते, संधी सारखी द्यायची नसते असं स्पष्ट करत शरद पवारांनी अजित पवारांना आता संधी नाही हे जाहीर केलंय. पहाटेच्या शपथविधीनंतर आमच्या सहकाऱ्याला एक संधी दिली. मात्र संधी सारखी दिली जात नाही असं पवार म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे पवारांच्या विधानाने संभ्रम निर्माण झाला असताना, पवारांनी केंद्र सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. शेतकरी हिताआड येणाऱ्यांना कधीही पाठिंबा नाही असं पवार म्हणाले. सत्तेचा वापर हा पक्षात फूट पाडण्यासाठी केला जातोय असं पवार म्हणाले. दरम्यान शरद पवार यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास अजित पवार यांनी नकार दिला आहे. 


काय म्हणाले होते शरद पवार
अजित पवार हे आमचेच नेते आहेत असं विधान शरद पवारांनी केलं होतं. काही जणांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्षात फूट पडली असं मानण्याचं कारण नाही असं पवारांनी म्हटलंय. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही असं सुप्रिया सुळे यांनी काल म्हटलं होतं. त्यावर शरद पवारांना आज बारामतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार हे आमचे नेते आहेतच, मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्षात फूट पडली असं नाही असं पवारांनी म्हटलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं.


पवारांच्या राजकारणाचा भाग
अजित पवार आमचेच नेते आहेत या शरद पवारांच्या विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिलीय. पवारांचं मनपरिवर्तन होऊन ते लवकरच एनडीएत येतील असं भाजप प्रदेशाध्यक्षांनी म्हटलंय़. तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यात या विधानांमुळे संभ्रम निर्माण होत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाने केलीय. दुसरीकडे काँग्रेसने मात्र सावध भूमिका घेत पवारांच्या स्ट्रॅटेजीचा हा भाग असू शकतो असं म्हटलंय. 


तर शरद पवारांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिलीय...राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मोठा गेम आहे...ुपवार जे बोलतात ते करत नाहीत...त्यामुळे जास्त लक्ष दिलं तर डोकं फुटायची वेळ येईल असं कडूंनी म्हटलंय...


शरद पवार आमचे देव
शरद पवार यांच्या वक्तव्यावरुन राजकारण सुरु असताच  शरद पवार जे बोलले त्याबाबत मी बोलणं योग्य नाही मात्र आम्ही आमच्या देवाला इतकंच म्हणत होतो की कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या आणि आमच्या देवाने आमचं ऐकले, आम्ही  त्यांचे आभार मानतो
त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या आहेत अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनि दिली आहे. देवाने आशीर्वाद दिला म्हणजे देव आजूबाजूलाच असतो आमची प्रार्थना भगवंतांनी ऐकली,  पक्षात बहुसंख्य लोकांची इच्छा हीच  होती आमच्या देवांने आमचे ऐकलं, असं मुंडे यांनी म्हटलंय.