Maharashtra Politics : अजित पवार... (Ajit Pawar) राज्याच्या राजकारणातलं असं नाव जे भाजपला (BJP) जवळचं वाटतं आणि मविआचे नेतेही ज्यांची स्तुती करताना थकत नाहीत. मात्र याच अजित पवारांमुळे मविआचं (Mahavikas Aghadi) टेन्शन वाढलंय. कारण दादा कोणत्याही क्षणी भाजपसोबत जातील, अशा खमंग जोरदार चर्चा सुरु झाल्यात. तपास यंत्रणांना हाताशी धरुन कुटुंबावर दबाव आणला जातोय अशी तक्रार संजय राऊत (Sanjay Raut) करतायत. राज्यात 15 दिवसांत राजकीय मोठा भूकंप होणार असं भाकित प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) वर्तवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वज्रमूठ सभेत दादांनी भाषण टाळलं?
त्यातच अजित पवारांनी दिवसभरातले आणि तेही पुण्यातले सारे कार्यक्रम रद्द केलेत. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आशिष शेलारांसोबत तातडीनं दिल्लीला रवाना झालेत. बरं त्यात अजित पवारांनी शिंदे सरकारबद्दल(Shinde Government) केलेल्या विधानामुळे संशयाचं धुकं आणखी गडद झालं. शिंदे अपात्र ठरले तरी सरकारला धोका नाही असा बॉम्बच दादांनी फोडलाय. त्यात भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नागपुरात मविआच्या वज्रमूठ सभेत (Vajramooth Sabha) भाषण करणाऱ्या वक्त्यांच्या यादीत दादांचं नावच नव्हतं. दादांनी भाषण का केलं नाही हे स्वत:च त्यांनी सांगितलं असलं तरी खरं तेच कारण होतं का याचीही चर्चा सुरु आहे.. 


दादांच्या मनात खदखद का?
तसं पाहायला गेलं तर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार या काका-पुतण्यातील मतभेद हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच खमंग चर्चेचा मुद्दा राहिलाय. 2004 पासूनच अजित पवारांच्या मनात खदखद असल्याचं बोललं जातंय. 2004 साली विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळूनही राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं. तिथूनच शरद पवार-अजित पवार यांच्यातील मतभेदाला सुरुवात झाली असं बोललं जातंय. 2008 मध्ये छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री बनवण्यावरूनही अजित पवार नाराज होते 2012 साली अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. त्यावेळी अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिला होता. पुत्र पार्थ पवार यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. तो पराभव दादांच्या जिव्हारी लागला. 2019 मध्ये तर पहाटेचा शपथविधी उरकत अजित पवारांनी सत्तास्थापन केली होती 


अजित पवार समर्थक मुंबईकडे रवाना
अजित पवारांसोबत जे आमदार भाजपसोबत जाऊ शकतात त्यांच्याही नावाची चर्चा सुरु झालीय. यात अजित पवार समर्थक आमदारांचा समावेश आहे. अजित पवारांशी मुंबईत चर्चा करून ठरवणार असल्यानं मुंबईला जात असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी दिलीय. तर दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडेही मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच त्यांचे दोन्ही मोबाईलही बंद असल्यानं चर्चांना उधाण आलंय. अजित पवार समर्थक नेते हे अजित पवारांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत. अजित पवार जी भूमिका घेतील, ती शंभर टक्के मान्य असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंनी म्हटलंय. 


अजित पवारांची विरुद्ध भूमिका
अदानींच्या चौकशीचा मुद्दा असोत वा मोदींच्या डीग्रीचा मुद्दा.. शिवसेना-काँग्रेस या मुद्द्यांवर आक्रमक होत असताना अजित पवारांनी अगदी विरुद्ध भूमिका घेत मविआच्या आरोपातली हवाच काढली. त्यामुळे राजकीय पटलावर चर्चा आणखीनच रंगली होती.. आता तर दादा थेट भाजपात जाणार अशा चर्चा रंगतायत. त्यामुळे शिवसेनेसारखीच राष्ट्रवादीतही आगामी काळात उभी फूट पडणार आणि अजितदादा एकनाथ शिंदेचा गिरवणार का? याचीच उत्सुकता राजातल्या जनतेला लागलीय़.